अरुणकुमार जोशी - खूप दूरवरून तिच्या गाण्या...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
खूप दूरवरून
तिच्या गाण्यांच्या मंदिरापर्यंत
येऊन पोचलोय
मी
पण इथं हे असं कसं ?
या देवालयात तर कुणीच नाहीय
नुसत्या शुकशुकाटाशिवाय...
तिचं पूजेचं संध्यापात्र कुठाय ?
गाभार्यातली ही समई
इतकी क्षीणपणे का तेवतेय ?
अन् ही देवताही अशी
उदास चेहर्याची कशी झालीय ?
देव - देवताही कधी
उदास - अस्वस्थ होतात का ?
होतही असतील, कदाचित तेव्हा...
जेव्हा या घंटानादाचा प्रतिस्वर
राउळाच्या या भिंतीवरच आदळून
विशण्णता पसरवतो... !
आत्ताही तेच झालंय !
... पण खूप दूरवरून
तिच्या निःशब्दतेचं गाणं होऊन आलोय मी...
आणि सभोवार तर काहीच नाहीय...
तिचे डोळे इथं जो ठेवून गेले आहेत
त्या रिमझिम पावसाशिवाय... !
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2017
TOP