इरण्णा निंबाळ - श्रमपंढरीचा एक श्रमिक मी...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
श्रमपंढरीचा एक
श्रमिक मी वारकरी
दिंडी वाहतो श्रमांची
श्रम हाच माझा हरी
मनोभावे श्रमाला या
पूजणारा मी भाविक
नित्य येती मजसाठी
आषाढ आणि कार्तिक
जसा भक्त राउळात
तसा मी कारखान्यात
श्रमातच सावळ्याचे
रूप असतो शोधीत
नादब्रह्म उमटते
जसे टाळ - चिपळ्यांत
छिन्नी - हातोडीत माझे
स्वर इथे जुळतात
स्वेदगंगेच्या धारांत
चिंब भिजुनीया जातो
मीठ - भाकरीसच मी
गोड प्रसाद मानतो !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP