शिवबहादूरसिंह भदौरिया - बसू या जरा वेळ, ये तळ्याक...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
बसू या
जरा वेळ, ये
तळ्याकाठी कातळावर
काय तोडती लाटा ?
काय जुळवती लाटा ?
ये, बघू या
जरा वेळ, ये
जलात हलवून पाय...
मन मनाशी जुळवते मौन
की दुरावा आणते मौन ?
ते तपासू
नजर पुन्हा नजरेस खिळवूनी
अपुली क्षमता काय !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP