उमेश मोहिते - माझ्या मित्रा, कुणाकडून त...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्या मित्रा,
कुणाकडून तरी माझा पत्ता घेऊन
तू मला लिहिलंस...
मला खूप आनंद झाल तुझं पत्र पाहून !
सध्याच्या आधुनिक काळातही
कुणी तरी कुणाला तरी पत्र लिहितयं...!
तू पत्रात लिहिलंस :
‘ बायको कमवती असल्यानं
तूबीएचके फ़्लॅट आहे...
आउटिंगला जाण्यासाठी मोटार आहे...
मुलगी मॅनेजमेंट कोट्यातून
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहे...
मुलगाही एमबीए करत आहे...
एकुणात सारं काही उत्तम आहे...! ’
पण मित्रा,
झडी वांबाळीत मेणकापडाचा घोंगता पांघरून
वावरात राबणार्या माय - बापांविषयीही
जर तू एखादी ओळ लिहिली असतीस
तर मला अधिकच आनंद झाला असता !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP