अनुराधा साळवेकर - इथं आता शिशिर सुरू झालाय ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
इथं आता शिशिर सुरू झालाय
लांबवर धूसर होत जाणार्या झाडांच्या खांद्यांवर
बर्फ साचू लागलंय
झाडांची आसवं पानांतच गोथून जाताहेत
गळण्यापूर्वीच !
बर्फात गाडून घेण्याची सिद्धता केलीय आता झाडांनी
आता ती जणू योगनिद्रेत बुडून जातील
भवतालचं विश्वही त्यांना विसरून जाईल !
पुन्हा जेव्हा कधी
नव्या सोनेरी किरणांच्या ऊबदार स्पर्शानं
कोवळ्या कोंबांची लवलव सुरू होईल
तेव्हा
मला पुन्हा प्रश्न पडेल
मरणकळा सोसत राहून अंकुरित होण्याची
गोठूनसुद्धा टिकून राहण्याची
ही अजेय ऊर्मी ठेवतात तरी कुठं ही झाडं ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP