आशुतोष गाजरे - प्रश्न पडतो मला जिथं शांत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
प्रश्न पडतो मला
जिथं शांतता नांदायला हवी
तिथं बंदुकीच्या फैरींनी
स्फोटांनी, रक्ताच्या पाटांनी
नक्की साध्य काय होतं?
प्रश्न पडतो मला
जिथं पारदर्शकता हवी
तिथं मेजखालच्या द्रव्यानं
स्वार्थी गैरव्यवहारानं
नक्की साध्य काय होतं?
प्रश्न पडतो मला
जिथं कष्टाची गुढी उभारायल हवी
तिथं अपयशानं खचून
आत्महत्येच्या मार्गाला जाऊन
नक्की साध्य काय होतं?
प्रश्न पडतो मला
जिथं जीवन आदर्श असायला हवं
तिथं वाद-विवाद उकरून
हेवे-दावे बाळगून
नक्की साध्य काय होतं?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP