विमल गाडेकर - काही विचारायला गेलं की खव...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
काही विचारायला गेलं की
खवळलेल्या समुद्राच्या
फेसाळलाटा
जवळ येऊन आदळतात.
एकापाठोपाठ एक....
कोपलेल्या बैराग्यानं जटा आपटून
थैमान घालावं
तशा !
नंतर आकशाची निळाई पांघरून
निळाशार होतो समुद्र
जणू खोल रूतत जातात दोघं परस्परांमध्ये
आणि पुन्हा रूसला की
पोटाशी पाय दुमडून दूर जातो समुद्र
आपल्याशी बोलायचं नसलं की
हरेक लाटेबर हुकूम मी सांगत असते
त्याला की मी सोबत आहे म्हणून
तरी एकटेपणाच्या क्षितीजकळा
त्याला लागतातच कशा....?
मला या समुद्राचा
अमर्याद नितळ विश्वास
कधी होता येईल का....?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP