योगिता राजकर - आज पुन्हा.... माझ्यातल्या...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आज पुन्हा....
माझ्यातल्या ’मी’नं मला गाठलं
नाही नाही ते प्रश्न विचारून
भंडावून सोडलं
स्वतःच स्वतःला
पाहिलंस का गं तपासून...?
तू काचेची.... की?
मेणाची बाहुली?
तू मातीची....की
यातनेची सावली?
तू ताबेदार हकमाची...की
कसरत तारेवरची?
तू वाफ कोंडलेली...की
सस्मित छबी मोनालिसाची?
अशा असंख्य शब्दांच्या भोवर्यात
शोधत राहिले मीच मला....
हातांची मुक्तता झाली होती काचेतून
पण मग मनाचं....काय?
ते केव्हाच दास्यत्व पत्करून बसलेलं
स्वत्व हरवून जखडून राहिलेलं....
N/A
References : N/A
Last Updated : December 30, 2017

TOP