अमित वाघ - श्रीमंत दुःख झाले अन् मौल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
श्रीमंत दुःख झाले अन् मौल्यवान चिंता
गेली भणंग करुनी आयुष्यमान चिंता !
जर आतलेच अश्रू तर रक्त पाज ताजे
म्हणते ‘ अजून नाही शमली तहान ’ चिंता !
हे आजकाल जीवन ज्या धावते गतीने
उघडून त्यामुळे ही बसली दुकान चिंता !
प्रत्येक माणसाच्या नशिबात खोट आहे...
अन् केवढी निघाली ही भाग्यवान चिंता !
माणून संकटांना घेतो कशा प्रकारे...
त्याच्यावरून ठरते मोठी - लहान चिंता !
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP