नर्मदाप्रसाद खरे - तुझीच गीते गुणगुणते मी मू...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझीच गीते गुणगुणते मी
मूक प्रतीक्षा... भरलें डोळे... अन् सांजवात उजळते मी
एके दिवशी अजाणता तू
खेळ मनाशी माझ्या केला
साठवूनही तुजला नयनी
जीव बघाया तुज तान्हेला
जिथे जिथे ही नजर स्थिरावे, तिथे तिथे तुज बघते मी !
ओझरत्या भेटीतच अगदी
छाप मनावर तुझी उमटली
फुले फुलवली वाटेवर तू
वळनावर पण संगत सुटली
वाटेवरची तव पदचिन्हे मनोमनी ती जपते मी !
ऋतु बहराचा आला, झुलला
या डहाळिवर दोन क्षणांस्तव
वाळवंट हे... इथे परंतू
फुलून गेले वसंतवैभव
आता सगळे सुनेपणातच दिवस असे हे घालवते मी !
निरोपही घेतल्याविना तू
कातरवेळी निघून जाशी
मीलन - विरहाच्या संध्येवर
आभा उरली तुझी जराशी
नीरवतेच्या क्षितिजावर पण तुझा पायरव श्रवते मी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP