प्रा. सौ. सुनंदा शेळके - तुळशीला पाणि घालताना व्हा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुळशीला पाणि घालताना
व्हावी हिरवी - नाजूक किणकिण
तसा मधुर - मंगल
तुझा आवाज
माझ्या अस्तित्वावर
पांघरुन घ्यावा आणि
व्यवहाराच्या भिंतीकडे
पाठ फिरवून
करावा दीर्घ प्रवास
तुझ्या शब्दांचा गूढ - गुहांतून !
त्यासाठी -
पाठव ना लवकर
तुझा हळवा स्वर
आणि थोडी
ओठांची ओली थरथर !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP