प्रणव सखदेव - म्हणजे आता बघ हं तिथून नि...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
म्हणजे आता बघ हं
तिथून निघालास तेव्हा
काय आणलेलंस सोबत -
वळकटी
तीही फ़ाटलीच न शेवटी
पायपुसणं केलंस
आणि ती हळूहळू
विरून गेली अनंतात
आणि त्यानंतर
इथे आलास तेव्हा
एक वाडगा आण्लेलास ना ?
वापरूनवापरून
त्याचंही झिजलं बूड
शेवटी भंगारात काढलंस
मग शेवटी तर काय
उचकीघरघरच सोबत असेल
मग तू स्वत:देखील
सोबत नसशील तुझ्या
आडवा असशील ज्यावर
ती गादीही नेता येणार सोबत
मग बॅंकबॅलन्स तर फ़ारच दूर राहिला
पण याचा अर्थ असा नाही
रोमॅटिक होऊन
बॅंकबॅलन्स उधळून लावयचा
नाहीतर आत्ताच मरशील !
जगण्याला चिकडूनखेटून र्हायचं
कळलं का !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP