प्रा. मोहन कुंभार - तुझी आदळआपट माझं कवितेवरच...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझी आदळआपट
माझं कवितेवरचं प्रेम बघून
येणं रात्री - अपरात्री, वेळी - अवेळी
कवितेबिवितेचे कार्यक्रम आटोपून
तेव्हा तुझा चेहरा निराशेनं ग्रासलेला
मला दिसतेय तुझ्या चेहर्यावर
अशा नवर्याशी संसाराचा सारीपाट मांडून
फ़सल्याची निराशा
कशातच नसतो तुला उत्साह
आणि मला नसतो वेळ
मुलांच्या शिक्षणबिक्षणासाठी
तुझ्या मनाची घालमेल
संसाराचा गाडा एकटीनंच ओढून
मी मात्र शरमल्यासारखा
तुझी नजर चुकवत
एकटा एकटा बसलेला
काहीच लिहू नये
कविताबिविता अशा नादात
आणि या एकांतातच
सुचत जाते मला नवी कविता !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP