मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
एकदा जमीन नांगरताना बा आई...

संतोष आळंजकर - एकदा जमीन नांगरताना बा आई...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


एकदा जमीन नांगरताना
बा आईला म्हणाला :
‘ फक्त एवढं साल जास्ती राबायचं
सावकाराचं रिन फेडून
एक इटाचं घर बांधायचं ’

खोपटाकडं बोट दाखवून
मग माय मला म्हणाली :
‘ तुज्या बाचं आसंच हाय
आमचं लगीन झाल्यापासून निसतंच म्हन्ताय
एवढं साल जास्ती राबायचं
सावकाराचं रिन फेडून
एक इटाचं घर बांधायचं... ’

एवढी सालं आली अन् गेली
जमीन नांगरली...पाऊस पडला...पिकं आली...
सावकाराची कोठी भरली
अन् आमची कणगी मात्र रिकामीच राहिली

अशीच कैक सालं राबता राबता
आई - बाचं जीवन सरलं
अन् एक इटाच्या घराचं सपान
खोपटातच राहून गेलं...!

N/A

References : N/A
Last Updated : August 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP