मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
चष्म्याला माझ्या ओ देता य...

ज्योती देवळालीकर - चष्म्याला माझ्या ओ देता य...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


चष्म्याला माझ्या ओ देता येईल ?
असं कधी होईल ?
सुखावलेल्या मनाचा फोटो काढता येईल ?
असं कधी होईल ?
उद्याची पहाट आज माझ्या चित्रात येईल ?
असं कधी होईल ?
पाण्याच्या लहरीवर तरंग शांत राहील ?
असं कधी होईल ?
बुद्धीच्या वाटेवर मन सरळ जाईल ?
असं कधी होईल ?
सहजपणे दुःखाला खो देता येईल ?
असं कधी होईल ?
पळणार्‍या मनाला कुंपण घालता येईल ?
असं कधी होईल ?
माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील ?
असं कधी होईल ?

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP