प्रफ़ुल्ल पाटील - प्राचीनातल्या अवकाशांतरी ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
प्राचीनातल्या अवकाशांतरी
कितिक विमाने होती उडली
काळ्समुद्री दीर्घ अथांग
हन्त! हन्त! ती सर्वचि बुडाली!
वेद, पुराणे मुखर स्मृतींच्या
क्षीण क्ष्यिष्णु लाटांवरती
व्यर्थ शोधिती अवशेषांना
उभे राहूनि काठावरती
कवटाळुनि दृढ अथकावेशे
मिथकांचे ते लटिके वास्तव
कालव्यतित जे सनातन तरी
उर्जाव्यय ना होतो त्यास्तव ?
विमान पुन्हा उडेल, जेव्हा-
विज्ञानाची उगवेल उषा;
अज्ञानाच्या तमोतळातून
तरूनि नि येईल कृष्ण - मंजुषा!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP