डॉ. स्मिता पाटील - उगमापाशी पुन्हा कधी ना पर...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
उगमापाशी पुन्हा कधी ना परतुन येते नदी
पुढे पुढे ही सारखी वाहत जाते नदी
कधी भेटती कठीण कातळ
कधी लाभते माती प्रेमळ
राग न कसला, न कसली खळखळ...हसत राहते नदी
बीजामधुनी प्राण फुंकते
पालन करते, पोषण करते
कर्तव्याला कधी आपुल्या कधी न चुकते नदी
हिरवी वस्त्रे कधी भरजरी
कधि काट्यांच्या तीक्ष्ण पंजरी
घाव लपवते उरात सगळे, पण ना उदास होते नदी
जुने पाश ती सहज तोडते
नवीन नाती सहज जोडते
गहन - गूढ सागरी समर्पित होउन जाते नदी
दु:ख कुणा ना सांगत फिरते
सहजच सारे सोसत जाते
नवे क्षेत्र; तरिही रमते...स्त्रीजन्माचे गूज सांगते नदी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP