शेखर जोशी - अखेरचा श्वास थांबल्यावर स...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अखेरचा श्वास थांबल्यावर सुरू व्हावा
सनई...सतार किंवा संतूरचा आनंदी सूर
निश्चल देहाशेजारी
माझ्याच हस्ताक्षरातला असावा एक कागद
वाचता येईलसा...
‘ या जन्मात यानं शब्दांइतकंच सुरांवरही प्रेम केलं...
अगदी अनवट रागांच्या सुरांवरसुद्धा ! ’
पण नाही देऊ शकला त्यांना न्याय
आपल्या गळ्यातून हा माणूस
म्हणूनच सोबतीला असू द्या हे सूर
पुढच्या जन्मासाठी ( असलाच तर ! )
उपयोगी पडतील या सुरावटी
कदाचित सहज...
सापडेल ‘ सम ’ आणि ‘ लय ’ आयुष्याची
होईल प्रवास सोपा
या देहाचा...
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2017
TOP