मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
लहानपणापासून वाचत आलोय , ...

जयंत पाटणकर - लहानपणापासून वाचत आलोय , ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


लहानपणापासून
वाचत आलोय , ऐकत आलोय
निरपेक्ष माया, प्रेम , आदर देणार,
सहकार्य करणारे असतात जगात.....
कामाच्या निमित्तानं
अनेकजण संपर्कात आले
सगळ्यांशी भाबडेपणानं वागत राहिलो
वाटलं, कुणीतरी भेटेल आपल्याला समजून घेणारं ....
वागण्यावरुन, चेहर्‍यावरुन
समजलं  नाही कुणाच्या मनातलं
थोडयाच दिवसांत लक्षात यायचं
काही उपयोग नाही ... !
आता मनाला सवय झाली आहे
आपोआप
बरं- वाईट, आता उरलेल्या आयुष्यात तरी
भेटेल का कुणी
निरपेक्ष माया, प्रेम, आदर देणारं?
सहकार्य करणारं?

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP