प्रताप राजेशिर्के - झाड म्हणजे आय झाड म्हणजे ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
झाड म्हणजे आय
झाड म्हणजे माय
झाड म्हणजे तुमच्या-माझ्या
काळजातल्या हिरवाईची साय
झाड हवं अंगणात
झाड हवं परसात
झाड हवं तुमच्या-माझ्या
मनातल्या जंगलात
पाखरू गाई झाडांचं गाणं
झाडांचे सूर वारा वाहे
आकाशात घुमते झाडांचा नाद
मातीला कळते झाडांची साद
झाड नसते मुके
झड नसते आंधळे
झाडांची वाणी
कुणास का न कळे?
एकेक बी निवाडावी
पऊसओल्या मातीत रुजवावी
झाडाची जन्मगाथा
डोळ्यांत साठवावी
मी नाही जानबा
मी नाही तुकया
पण कुठून उगवलं झाड
माझ्या श्वासातल्या गाण्यात?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP