कृष्णमुरारी पहारिया - माझाय मनाची बासरी नादवू ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझाय मनाची बासरी
नादवू नको तू
निजलेले माझे दुःख
जागवू नको तू
समजून घेउ दे मज
इतरांची गार्हाणी
समदुःखी मित्रांची
मला गाउ दे गाणी
एखाद्या निद्रित स्वप्नाची
आस दावुनी
नजरेच्या भाषेत मला
गुंतवू नको तू
या घडीस मजला
गात राहू दे गान
मग आहेच पुढे
जन्मभरी विषपान
पण अता करू दे
गाण्याचे अमृतपान
उभारून बाहू
मज थांबवू नको तू
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016

TOP