मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
वाटत असते तुला पहावे; पण ...

केदार पाटणकर - वाटत असते तुला पहावे; पण ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


वाटत असते तुला पहावे; पण मी पाहत नाही
नजर भेटली चुकून तर मग मीही लाजत नाही !

इथे आजवर तुझेच डोळे वाचत वाचत आलो...
कोण म्हणाले, आजकालची पिढीच वाचत नाही !

घाट, दर्‍यांची सावकाश मी मौज अनुभवत जातो
वेगाने मी कधीच कुठले अंतर कापत नाही !

दोघांनाही परस्परांची सवय एवढी झाली
परस्परांच्या दर्शनाविना दिवस उजाडत नाही !

गप्पांमध्ये ऊन्ह कोवळे मला म्हणाले होते:
‘ हल्ली त्याच्याशी इतकेही कोणी बोलत नही ! ’

या मुद्द्याची शत्रूंनीही नोंद घेतली आहे -
सहजासहजी मीही माझा मुद्द सोडत नाही !

तुम्हाविना मित्रांनो झाली अशी अवस्था माझी
टपरीवरचा चहा जिभेल गोडच लागत नाही !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP