वैभव कुलकर्णी - वेदनांची मिरास आहे हा... ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वेदनांची मिरास आहे हा...
छान एकांतवारा आहे हा...
कोणते फ़ूल उमलुनी आले ?
की मनाचा सुवास आहे हा ?
या प्रमेयास सिद्धता नाही...
कल्पनेचा विलास आहे हा !
ऐल ना पैल गाठुनी होतो
फ़क्त मधला प्रवास आहे हा
मी जगावेगळा खुळा असणे...
साधलेला विकास आहे हा !
अन्वयाला अभ्य कुठे आहे ?
एकतर्फ़ी समास आहे हा !
आणखी एक श्वास आला रे...
विठ्ठला, काय त्रास आहे हा !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP