मोहन शिरसाट - इथल्या मातीतून उगवलेले आम...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
इथल्या मातीतून उगवलेले आम्ही
इथल्या मातीत आलेल्यांना जगवले आम्ही
इथल्या मातीतले वायतेय नसानसांत रक्त
इथल्या मातीत प्रसवतो आसमंत मनमुक्त
इथल्या मातीतले श्वास आमचे
इथल्या मातीचे उच्छ्श्वास आमचे
इथल्या मातीतली मुळं आमची
इथल्या मातीतली कुळं आमची
इथल्या मातीतलेच बीज आमचे
इथल्या मातीत झीज झीज झीज आमचीच
इथल्या मातीत लखलखती वीज आमची
इथल्या मातीतला गंध आमचा
इथला आमचाच सुगंध दरवळतो सर्वत्र
इथल्या मातीत आमचाच घाम
बरसतो पाऊस म्हणून !
इथल्या मातीत तेवते ज्योत आमची
इथल्या मातीत ओतपोत डोलतेय
हिरवं इमान आमचं
इथल्या मातीतूनच उगवतं सूर्यफुल आमचं
इथल्या बहुगुणी मातीवर सुरूंग लावणार्यांना
आम्ही जाब विचारला
...तर आम्हीच देशद्रोही ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP