मोहन कुंभार - मिरगाचा पाऊस रिमझिमाया ला...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मिरगाचा पाऊस रिमझिमाया लागल्यावर
लहानपणी गायचो पावसाची गाणी
येर येरे पावसा
तुला देतो पैसा...
तेव्हा कोसळायचा पाऊस अनाधार
धुळीच्या कणातून सुटायचा गंध
पहिल्या पावसाचा नाकातून आरपार
कानात वारा शिरलेल्या वासरासारखे
हुंदडायचो माळभर
जगणंच व्हायचं ओलचिंब
आंतल्या आंत रिमझिम रिमझिम
इंद्रधनू होऊन जायचो
झेलतांना थेंब थेंब...
...पावसा पावसा कोसळ
कोसळ माझ्या माथ्यावर
झिरपू दे तुझे थेंब
माझ्या नसात शरीरभर
होईन मी निर्विकार
रूजून येईन गवतासारखा
नितळ नितळ हिरवागार
निथळ माझ्या रक्तातून
पाझर माझ्या नसांतून
माझ्यामधला चिखल जाऊ दे धुऊन
फुटू दे मनाला माणुसकीचे नवे कोंभ...!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP