मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
जय जय संत वारकरी । पायी क...

विठ्ठल मोरे - जय जय संत वारकरी । पायी क...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


जय जय संत वारकरी ।
पायी करिती पंढरीची वारी ।
करिता त्यांची प्रेमे सेवा ।
अगणित मिळे पुण्यठेवा ।
ज्यांनी प्राप्त केला भगवंत ।
धन्य धन्य ते वारकरी संत ।
जोडोनिया दोन्ही कर ।
मस्तक तयांचे चरणावर ॥
******
वारीत अगणित माता - भगिनी ।
चालती डोईवरी तुळस घेवोनी ।
काय भक्तिभाव असेल तो मनी ।
वाहू तुलसीदल विठ्ठलचरणी ।
अंतःकरणी दाटे विठ्ठलप्रेम ।
तेणे पुलकित होय रोम रोम ।
माउली तुझिया चरणी नमन ।
धन्य तू, जीवन केले पावन ॥
******
आज एकादशी, आषाढी वारी ।
दर्शनास आले अगणित वारकरी ।
पंढरीत उसळे भक्तीचा रंग ।
आनंदाचा कंद श्रीपांडुरंग ।
विठ्ठलनामाचा करीत जप ।
पायी चालण्याचे केले जे तप ।
ते श्रम आजि फळासि आले ।
श्रीविठ्ठलाची देखिली पाउले ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP