मेघा गायकवाड - तिला जगणं अधिक लांबलचक वा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तिला जगणं अधिक लांबलचक
वाटू लागतं...
जेव्हा भोवतीच्या वर्तुळाची जाणीव होते...
सुबक, सुंदर, पारदर्शक...
एक काचेच वर्तुळ..
जुआतून तिनं हे सुंदर जग पाहायचं;
पण त्याच्याशी एकरूप नाही व्हायचं !
बालपणापासून तिला एकच शिकवलेलं
फ़क्त ते वर्तुळ सुरक्षित असतं...
आणि सारं जग फ़ार फ़ार वाईट....
आता आता तिचा जीव त्या वर्तुळात
घुसमटायला लागतो...
कधी झरणारा पाऊस, तर
कधी बेभान वारा तिला खुणावतो...
तिला ती कैह असह्य होते...
रागावून ती स्वत:चा श्वास रोखून धरते...
पण तरीही ती जिवंतच...
अरे, आपण इथं श्वास घेतच नव्हतो...
प्राण्वायूशिवाय जगण्याची वर्तुळात सोय
असते....!
मग ती त्वेशाने काच भेद पाहते... पण
काचेवर ठिकठिकाणी लांबलचक कायदे,
नियम आणि संहिता
लिहिलेली असते...
-की तिनं कायम वर्तुळातच राहावं...!
’मला साफ़ नामंजूर आहेत हे नियम
मी नाही आता त्यांना जुमानणार...’
असं म्हणत जिवाच्या आकांताने ती
घणाचा घाव त्या काचेवर घालणार...
तितक्यात तो वरचे वर अडवला जातो...
दोन कोवळ्या हातांनी... !
मग मात्र तिचे हातच लुळे पडतात...
आणि ती असहाय्यपणे फ़िरत राहते... त्या
वर्तुळात...रात्रंदिवस
अश्वत्थाम्यासारखी... एक दुखरी जखम घेऊन...!
N/A
References :
७०५७६६५२०१
Last Updated : November 11, 2016
TOP