सुनील टिल्लू - पहाटे पहाटे कोवळा गारवा य...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पहाटे पहाटे कोवळा गारवा यावा
इतक्या कोमलपणे
उगवलं माझ्याआत हे झाड
फांद्याफांद्यांतून विस्तारत गेलं
सगळ्या शरीरभर
तेव्हा जागंच होतं शरीर
स्वप्नात जागं असावं तसं...
तेव्हा पानांना नवीन रेषा फुटतानाही
झाडाला अनोळखी वाटत नसे
रेषा फुटून जुनी झाली तरी
तिची ओळख ताजी राहायची
सगळ्या शरीरभर
ऋतूऋतूतून पाना-फूलांनी
आपापले अंग पालटतानाही
कधी परकं वाटलं नाही झाडाला
फांदीवर येऊन बसलेल्या
पक्ष्याच्या गळ्यातून
अवेळी उमटलेली लकेरही
झंकारत जाई
सगळ्या शरीरभर
पाहता पाहता मध्येच कुठं
सांडून गेला त्याचा
परवलीचा हिरवा शब्द
माझ्या शरीराला साद घालणारा?
अन दूर गेला कुठं मातीचाही गंध...?
मी कधी हट्ट धारला नाही
त्या हिरव्या सळसळीतून
मिळणार्या प्रतिसादाचा
फुटणार्या प्रत्येक पानाचा
उमलणार्या प्रत्येक फुलाचा
अर्थ कळावाच असाही आग्रह नाही माझा
मात्र त्याची निजखूण असणारा
तो पारवलीचा हिरवा शब्द
तेवढा सापडायला हवा
आणि पानापानातून
हिरव्या श्वासाचं गाणं
वाहत राहायला हवं...
बस!
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP