अरुण कटारे - कोण कसे अन् कोण कसे हे ओळ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कोण कसे अन् कोण कसे हे ओळखून घे जरूर आता
खरे चेहरे, खरे मुखवटे चाचपून घे जरूर आता
मैफलीत तू, पंगतीत तू, रस्त्यावरच्या गर्दीमध्ये...
खणखणणारे अपुले नाणे वाजवून घे जरूर आता
जगासोबती चालायाचे...जगासोबती रहावयाचे...
सगळ्यांसोबत अपुले घोडे दामटून घे जरूर आता
धर्म - जात हे खूळ असे, की विनाश व्हावा पार जगाचा
माणुसकीने मन सगळ्यांचे नांगरून घे जरूर आता
मस्त कलंदर जगण्यासाठी लाव पणाला तुझी जिंदगी
लाट होउनी काठावरती आदळून घे जरूर आता
प्रत्येकाचा रंग वेगळा...रंगामधला रंग वेगळा !
वेगवेगळेपणाच त्यांचा पारखून घे जरूर आता
N/A
References : N/A
Last Updated : April 24, 2017
TOP