मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
अतिमुलायम रेशमी, मृदू स्प...

धर्मवीर भारती (१९२६-१९९७ ) - अतिमुलायम रेशमी, मृदू स्प...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


अतिमुलायम रेशमी, मृदू स्पर्शाचा तो पोत...

त्याला नाव काय देऊ ?

एक फुललेलं - उमललेलं सुख,
एक मधुर तंद्री,
एक हरपलेपण...
थरथरत्या अधीर तळहातांवर तोललेला
तो फुलासारखा देह...
प्रत्येक स्पर्श त्याला करत जातोय
अधिकच अस्पर्श्य !
देहाची धुंदी; परंतु देहापेक्षा दूर...देहाच्या पार...
अंधारात तो दिसत तर नाही;
पण उधळतोय दूरपर्यंत
डवलून - फुलून आलेल्या
सुगंधाचा धुंद बहर...

पारिजातासारखं ते प्रेम...

त्याला नाव काय देऊ ?

ते अनोखं, अनाम, अपरिचित, निराकार....
असं काहीतरी

त्याला नाव काय देऊ ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP