राजीव शास्त्री - ती पहाटेच उठते योग आणि प्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ती पहाटेच उठते
योग आणि प्राणायाम करते
स्वत:ला आणि घराला
निरोगी राखायला -
नंतर स्वयंपाकघर...
या कामाला पर्याय नसतो
फ़ारतर थोडीशी मदत
दोन तास जातात...
स्वत:चे आवरणे
आणि निघायची तयारी
कधी रिक्षा, कधी बस
कामाची वेळ गाठायची असते...
तिथली जबाबदारी, स्वयंशिस्त
आणि सरळमार्गी संस्कार
निघताना पर्समधली पिशवी हातात
भरलेल्या पिशवीने घरात...
थोडा वेळ बसते
मुलांशी बोलते
स्वयंपाक, जेवण, आवराआवर
तिचा दिवस संपतो...
काहीतरी वाचताना झोप लागते
कुणीतरी तिला पांघरूण घालते
सुशिक्षित, मध्यमवर्गीय स्त्री
उद्याची तयारी करतेय...!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP