विजय सोपान कडाळे - आज सहा डिसेंबर आम्ही मिळू...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आज सहा डिसेंबर
आम्ही मिळून सारे धम्मचारी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी
एकत्र येऊन जमलो आहोत
मनात शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा
हा संदेश उराशी बाळगून.
आम्ही मिळून सारे धम्मचारी
प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी
शिका म्हणजे शिकलो आहोत
संघर्ष करा म्हणजे अन्यायाविरुद्ध लढतो आहोत
पण संघटितपणाचे काय...
आम्ही मिळून सारे धम्मचारी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी
गटागटात विभागलो आहोत
परिणामी नेमकी ॥ शिका ॥ संघटित व्हा ॥ संघर्ष करा ॥ हीच विचारधारा
गटागटात विभागली गेली आहे.
परिणामी नव्या पिढीला रोज एक नवा संघर्ष करावा लागतो आहे.
आणि हो परिणामी म्हटलं तर रोज एक नव्या गटाची स्थापना होते आहे.
हे असंच चालणार आहे का...
काही कळतंच नाही
पुन्हा पुन्हा तोच तो प्रश्न ऐरणीवर येतो आहे
समाज शिकला
संघर्ष करतो आहे
मात्र संघटितपणाचे काय...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP