हरिश्चंद्र पाटील - ‘ बायकूला आखिरपत्तोर साथ ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
‘ बायकूला आखिरपत्तोर साथ देईन...
सुखाचा संसार करीन ’
अशी शपथ त्यानं
लग्नात सप्तपदी घालताना
मोठ्या विश्वासानं घेतली होती...
दुष्काळ पडला
कर्ज काढलं
कर्ज फिटंना
व्याज वाढलं
गड्याचं दगडावानी बळकट काळीज
मेणावानी वितळलं
फास करून दावं फांदीला बांधलं
सुखी संसाराचं स्वप्न झाडाला टांगलं
बायको रडली...पडली
आणि रडत रडताच
तिचं मेणावानी काळीज
दगडावानी घट्ट झालं !
N/A
References : N/A
Last Updated : April 24, 2017
TOP