मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
घावात कुर्‍हाडिंच्या, फाट...

महादेव बी. बुरूटे - घावात कुर्‍हाडिंच्या, फाट...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


घावात कुर्‍हाडिंच्या, फाटे तुटून गेले ।
सावलीत वाढलेले, रावे उठून गेले ॥

वैशाख पेटलेला, वनवा चेतना वनी
झळी झळाळते जल, कोणी लुटून गेले ।

शिकार करण्या गेले, अन् तेच बळी झाले
पाठीवरचे त्यांच्या, भाते सुटून गेले ।

जली फरटले नाव, अन चाव वादळांचा
कसलेले नावाडी, संकट कटून गेले ।

एक झोपडे होत, प्रांतात वार्‍याच्याच
खेळात वादळाच्या, ते विस्कूटून गेले

पडझडीत शिशिराच्या, गात्रे गारठलेली
बहरात वसंताच्या, अंकुर फुटून गेले ।

घावात कुर्‍हाडिंच्या, फाटे तुटून गेले ।
सावलित वाढलेले, रावे उठून गेले ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP