अशोक मिरगे - नभ झाकळून आलं, तुझी लागली...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
नभ झाकळून आलं, तुझी लागली चाहूल
अवचित माझ्या दारी पडे पहिलं पाऊलं
तुझ्या येण्यासंगं आला अवखळ गार वारा
त्याच्या स्पर्सानं सर्वांगी ओला फुलला शहारा
झालं अचानक येणं, आता विरह मिटला
आणि एकटेपणाचा सारा संदेह फिटला
तुझ्या श्रावणसरींनी माझं भिजलं अंगण
चिखलात रेखाटलं बाळकृष्णाचं रांगणं !
असा तुझा सहवास रोज नवा नवा वाटे
तुझ्या सहस्त्र थेंबांचा स्पर्श हवा हवा वाटे
आता पुन्हा नको आम्हा दुष्काळाची आठवण
गाव - शिवारात करू आम्ही तुझी साठवण !
असा बरसत राहा, नको देऊ पुन्हा धोका
आम्ही घेऊ पावसात, आनंदाचा उंच झोका !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP