मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
माझिया डोळा पहिले मी माझे...

सौ. निर्मला मठपती - माझिया डोळा पहिले मी माझे...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


माझिया डोळा पहिले मी माझे मरण
देह जाळण्यासाठी माझा. आणले गेले सरण

माझ्याजवळ माझी पत्नी बसली होती
भोकाद पसरून मोठ्याने माझे गुण गात होती
 
हिरमुसली माझी मुले भोवतीचं बसली होती
भांडणार्‍या आपल्या आईचे वेगळे रूप पाहत होती

शेजारी पाजारी सारखे येऊन जात होते
कोरडी सहानभुती वरवर देऊन जात होते

ऑफिसमधले सारेजण जमा झाले होते
सुट्टी आत मिळणार म्हणून बेत रचत होते

शिव्या देणारा माझा बॉस चेहरा बदलून आला
ऑफिसचे पैसे स्वतःचे भासवून बायकोस देऊन गेला

रडण्याचे ढोंग करून घरमालक येऊन गेला
'' जागा खाली करा '' कानात हिच्या सुचवून गेला

उसने पैसे घेतलेले मित्र मिटक्या मारत होते
माझे सच्चे मित्र मात्र दुःख करीत होते

त्यांच्याकडे पाहून मी समाधान पावलो
आणि लवकरच मी अगदी दूर दूर गेलो.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP