माधव राजगुरू - कुणासाठी कुंजवन बनतात रस्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कुणासाठी कुंजवन बनतात रस्ते
कुणासाठी काटेरीच असतात रस्ते
वाटतात तितके सोपे नसतात रस्ते
भला - बुरा असो कसाही
माणसाचा इतिहास लिहितात रस्ते
कुणी चालो न चालो, चालतात रस्ते
थकून येता पांथस्थ कुणी
हळुवार पावलांशी हितगुजतात रस्ते
रानावनात, दूर दूर भटकतात रस्ते
लळा इतका माणसांचा की
वस्तीच्या दिशेनं पुन्हा परततात रस्ते
निर्मनुष्य जेव्हा रात्री होतात रस्ते
डोळे लावून पूर्वक्षितिजाला
कुणाची तरी वाट बघत बसतात रस्ते
चालताना पावलांत अडखळतात रस्ते
हरवून जाता जीवनदिशा
नव्या आशा मनी पालवतात रस्ते
कधी जिवलग मित्रही बनतात रस्ते
कुण्या अगतिक प्रेमिकांची
संगत - सोबतही करतात रस्ते
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP