अरूण नवले - पावसाळी ढग पावसाळी हवा पा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पावसाळी ढग
पावसाळी हवा
पाऊस हा नवा
मृगातला
पावसाळी नभ
मातीचा सुगंध
नवा रंग गंध
दरवळे
मृगाचा पाऊस
पावशाचा नाद
देतो प्रतिसाद
गाण्यातून
मृगाचा पाऊस
संवाद मनाचा
आकाश मातीच्या
मिलनाचा.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP