श्रीपाद भालचंद्र जोशी - गांधींबद्दल बोलतच नाही आह...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
गांधींबद्दल बोलतच नाही आहे तो
त्यांच्या माध्यमातून तो बोलतो आहे
नंतरच्या कुरूपतेविषयी
असे म्हटल्यावर
माध्यमांनी एकच गलका केला
म्हणाले, न्यायालयाला कविता समजत नाही
असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?
पण माध्यमांनो,
त्यांना ती कळते असे तुम्हाला तरी म्हणायचे आहे काय ?
कवितेतले काही कळते असे
त्यांचे म्हणणे असते तर
त्यांना ते समजून सांगणे
त्यांनी कवीवर कशाला सोपवले असते ?
आपल्याला ना गांधी समजून घ्यायचा आहे
ना कुरूपता
कलावंत तर नकोच आहे आपल्याला
आपल्या आदर्श राज्यात
इथे ऐकून घेतात न्यायालये,
त्यांचेही ऐकले जाते अजून
हे तरी बरे आहे
अन्यथा त्या लष्करप्रमुखाला दिला तोफ़ेच्या तोंडी त्यांनी,
राष्ट्रप्रमुखांचे भाषण ऐकतांना
डुलकी लागली त्याला म्हणून, तसे
इथे तर
कवीला सरळ फ़ाशीच दिले असते
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP