स्वाती पाटील - नव्या कोर्या कापडाचे मोज...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
नव्या कोर्या कापडाचे
मोजून-मापून केलेले तुकडे
जोडता जोडता
सांधत राहते ती
उसवत असलेलं मनाचं आभाळ.....
अन् अस्तर लावत जाते
ती वेळेआधीच
जीर्ण होऊ पाहणार्या जगण्याला....
नव्या कपडाच्या तुकड्यांचं
सुंदर वस्त्र बनवण्याचं कसब
चांगलंच जमतं तिला....
कदाचित् म्हणूनच
कठीण असलं तरीही
अशक्य वाटतंच नाही तिला
फाळा जाणार्या आयुष्याला
टाके घालणं....!
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP