वृंदा दिवाण - सध्या हे असं का होतंय, मल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सध्या हे असं का होतंय,
मला काहीच कळत नाहीय...
पण गावाकडं जाण्याची ओढ
संपत चाललीय...
आटून जात असलेल्या ओढ्यासारखी
चार वेशींच्या आतच
माझं हजारभर वस्तीचं गाव
चारी दिशांना उधळत
पसरत गेलंय बेफ़ामपणे...मातल्यागत !
‘ या अल्ला " असं केव्हाही म्हणणारा
मशिदीतला म्हातारा
अंधार फ़ोडून, वाडगा टाकून
कधी, कुठं गेला
गाववाल्यांनाही माहीत नाही
गाव बदललंय..
गावातली नवी पिढी
आता गावात रमण्यापेक्षा
फ़टफ़ट्या घेऊन
शहराकडं निघालीय...
आणि
रात्री रंगवून, धुंद होत
पहाटनंतर गावाकडं परतू लागलीय...!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP