मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
एका मातीतून दुसर्‍या माती...

संगीता केंजळे - एका मातीतून दुसर्‍या माती...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


एका मातीतून दुसर्‍या मातीत रुजत राहते ती
बाईपणाचं लेणं लेऊन सजत राहते ती
घरादाराच्या काळजीपोटी खपत राहते ती
सगळ्या प्रपंचाचं अस्तित्व जपत राहते ती
राग- लोभ, रुसवे-फुगवे गिळत राहते ती
फरशी- भांडी, धुण्याचे पिळे पिळत राहते ती
गोड-कडू सुख-दु:ख निमूट साहते ती
निरपेक्षपणे समर्मण करत राहते ती
समईतली वात होऊन घर उजळते ती
नात्यांमधला सुगंध होऊन दरवळते ती
सणवारात कुटुंबाला मायेनं बांधून ठेवते ती
पिढयांसाठी संस्कारशिदोरी रांधून ठेवते ती
पण खरं सांगू का, तशी वेडीच असते ती
मात्र घरच वेडं होतं, जेव्हा घरात नसते ती
बहीण, आई, पत्नी बनून पळत राहते ती
जशी दुधात साखर, विरघळत राहते ती

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP