स्मिता कुलकर्णी - मी येऊ दिलं नाही तिला वर्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मी येऊ दिलं नाही तिला
वर्ज्यच केलं होतं
शुद्ध सारंगातल्या धैवतासारखं!
चांगलं चाललं होतं माझं
सगळ्यांना सांभाळलं, जपलं.
हिच्याशी नातं तोडलं
तेव्हा माझी ओळख मीच मिटवली
आता पुन्हा ही झाली प्रकट
अगदी मी अंतर्धान पावण्याच्या वेळी
स्वतःला सांभाळणं अवघड जातंय
तेव्हापासून
ये बाई, स्वागत तुझं! आलीस जरी अवेळी
बैस आलीस तशी
सांग काहीतरी
मनात काय मझ्या
कळू दे तरी
आजवर जपलेलं
खोलवर गाडलेलं
व्यक्त होऊनही
विरून गेलेलं
माझी अनुमती मिळताच
ती आनंदली
आणि मग ठाण मांडूनच बसली माझ्यात
आता स्वारी कधीकधी उतरते कागदावर
बस तेवढंच तिचं विलग होणं
तिला ’कविता, कविता’ असं म्हणतात सगळेजण
पण हे तर कात टाकलेलं माझं मन!
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP