मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
प्रवाशाचा पुढे मुक्काम हल...

गणेश नागवडे - प्रवाशाचा पुढे मुक्काम हल...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


प्रवाशाचा पुढे मुक्काम हलल्यावर
दिसे का चलबिचल झाल्यापरी हे घर ?

कहाणी सांगते हळव्या ऋतूंमधली
तिच्या डोळ्यातली घनगर्द ओली सर

करूं संसार दोघेही सुखाने पण...
मला हे सांग, ‘ येते का तुला भाकर ? ’

कशाला थेंब गोळा करत बसलो मी ?
मला तर न्यायची होती रिती घागर !

खलाशी जसजसा छोटा दिसत जातो
किनार्‍यावर तसतसे गहिवरे बंदर !

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP