गणेश आघाव - विठोबा, उन्हानं करपलंय शे...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
विठोबा,
उन्हानं करपलंय शेत
पायांना पडल्यात भेगा
रक्ताळलयही कुठं कुठं
अन्
या ग्लोबल वर्तमानात
चेंजेस झाले आहेत मातीत !
स्वीकारत नाही ती
कुठलंच रासायनिक खात किंवा बी
पूर्वी कसा बांधावरच
घट्ट उभा असायचास तू
सर्या - वरंबे
ओढलेल्या रानात
बाप तिफणीवर करायचा पेरणी
अन्
तरारून यायची पिकं वर
आताशा
मातीपरीक्षण करूनदेखील
हाती लागतच नाही
हवा तसा रिझल्ट !
विठोबा...
सगळीकडंच सुरू आहेत
शेतकर्यांच्या अंतहीन हाल - अपेष्टा
बेतलंय त्यांच्या जिवावरच
रानभर...मनभर
कुठं आहेस तू... ?
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP