ऊर्मिला शहा - ती चांदण्यांच्या अक्षरां...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ती
चांदण्यांच्या अक्षरांशी
खेळत राहते
शब्दाला शब्द जोडून
लिहीत राहते काहीबाही
आभाळाच्या तुकड्यावर
ती
कोवळ्या उन्हाचं
तांबूस, केशरी रेशमी वस्त्र
पसरते दर्यावर
खेळत राहते लाटांशी स्वच्छंदपणे
ती
अबोलीसारखी निःशब्द होऊन
गुंफून घेते स्वतःला मालेत
सजवत राहते मूर्तीचा गळा
कधी अंतिम सोहळा ... !
ती
रुजवून घेते स्वतःला
खोल मातीत मुळांसारखी
झाडाचं हिरवेपण जपण्यासाठी
ती
कोरत राहते काळोहावर
तिचं एकाकीपण
ती
क्वचित कधी
माझ्या कुशीत शिरून मुसमुसते
कुठल्याशा अनामिक भीतीनं
मला बिलगत राहते
पुनःपुन्हा...
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2017
TOP