गोबिंद प्रसाद - तुझं येणं म्हणजे उघड्या ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझं येणं म्हणजे
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं
स्वप्न
तुझं येणं म्हणजे
दिव्यातल्या आतीचं अचानक
तेवणं
तुझं येणं
सुन्या आकाशात हळू हळू
उगवावा जसा तारा
तुझं येणं
नसानसातून खळाळतोय
जणू काही पारा !
तुझं येणं
जसं रात्रीच्या नीरवतेत
बुडून गेलेलं कुठलंसं शहर
तुझं येणं
जणू काही
निर्जन भग्नावशेषांत
फुलावा अचानक बहर !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016

TOP