प्रा. वसंत खोत - अखंड आवाजांचा दर्या उसळला...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अखंड आवाजांचा दर्या उसळलाय
- माझ्या सभोवती
कानठळ्या बसवणारे चित्र - विचित्र भेसूर आवाज
आदळताहेत चहूदिशांनी
वाटतं,
कानाला बसताहेत दडे
मेंदूच्या होताहेत ठिकर्या ठिकर्या
एकमेकांत मिसळून उसळणार्या आवाजांची ही कारंजी...
सगळेच बोलताहेत वरच्या पट्टीत ... एकाच वेळी
ऐकणारं कुणीच नाही !
ओळखू येत नाही कुणाचाच आवाच
उमगत नाही भाषा, शब्द अन् त्यांचे अर्थ
काहीच कळेनासं झालंय...
या अखंड गदारोळात मी हरवून बसलोय
माझा आतला - ओळखीचा आवाज
दाटून आलेलं बोलण्यासाठी, काही सांगण्यासाठी
मी करतोय नुसतेच हातवारे नि खाणाखुणा
अफाट गर्दीत मी असा
शब्दविहीन, हताश, एकाकी उभा
कुणी ऐकत - बघतही नाही माझ्या दिशेनं
मला आता त्याची गरजही वाटत नाही !
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP