सलील वाघ - दुर्लक्ष करायलाही वेळ नाह...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दुर्लक्ष करायलाही वेळ नाही इतके
मनातले मथळे एकरूप झालेत
मला सवड नाही तेवढीसुद्धा
ऐन मनाच्या
मध्यावर नांदतायत
रंगपृथक्करणाचे दुस्तर पाठहे
आणि ऍडॉब ऍल्डसचे काव्यानुभव
अनकंडिशन फॉर्मेटिंग / एस्
झीरो वन झीरो वन झीरो वन
झीरो वन झीरो वन झीरो वन
देअर इज डेन्सिटी
देअर इज नो डेन्सिटी
देअर इज डेन्सिटी
देअर इज नो डेन्सिटी
सिस्टिम ट्रान्स्फर्ड...
एक्स्पांड कंडेन्स्ड् एन्ल्जार्ड रिड्यूस्ड्
डेफ्थ ऑफ फोकसमध्ये
टिपूर रंगांच्या जलाशयात
शिकतोय निरीश्वर रंगांच अध्यात्म
चिन्हांकनांचे उकळते अव्याख्येय संदर्भ
सांदीकोपर्यात फारकत पेरणारे
ज्ञानाच्या तिरडीवरून चाललंय
माझं प्रेत
मनाच्या रिकाम्या
कॉरिडॉरमध्ये काचेपलीकडं
टेलिफोन मंद किणकिणतायत
मराठी भाषेची प्राणप्रतिष्ठा करताना
मी एकटा पडलोय तुंबळ एकटा
फेटाळला गेलोय
एकटा
ठेचला गेलोय
एकटा
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP