प्रमोद सोनार - हल्ली गावालाही पडू लागलीय...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
हल्ली गावालाही पडू लागलीय
शहरी रूपाची भुरळ
खपाटलेल्या पोटात रिचू लागलंय
बीअरबार - मटक्याचं गरळ
बांधावरच्या भानगडी आता
गटारीवर येऊन थांबल्यात
आणि गटा - तटाच्या चकमकी
भाऊबंदकीच्या काठावर
गावाचा शांतपणा उनाडलाय
अर्ध्या - पिकल्या बुद्धीवर
वडीलकीचा आसूड
केव्हाच सांदी - कोपर्यात खुंटीवर
ठासून भरलेल्या बंदुकीगत
गावाची नजर
प्रत्येकाचं बोट चापावर
‘ महायुद्धा ’ च्या ठिणगीवर
प्रत्येकाची आस
हिशेब पुरा करायला
शिवशिवणारे हात !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP